केसात गजरा, हातात बांगड्या, संगीत सोहळ्यात प्राजक्ताने नेसली आईची साडी, मराठमोळ्या लूकला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:17 IST2025-02-25T16:12:16+5:302025-02-25T16:17:26+5:30

Prajakta Koli : अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या घरी सध्या लगीनघाई असून ती लवकरच तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या घरी सध्या लगीनघाई असून ती लवकरच तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिची नुकतीच हळदी-मेहंदी सेरेमनी पार पडली. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता तिच्या संगीत सेरेमनीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या आईची लाल साडी परिधान केली आहे.

प्राजक्ता कोळीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या संगीत सेरेमनीचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स करताना दिसतेय.

संगीत नाइटमध्ये प्राजक्ता कोळीने वेस्टर्न लूक ऐवजी मराठमोळा लूक केला आहे. या खास दिवसासाठी अभिनेत्रीने तिच्या आईची लाल रंगाची साडी नेसली आहे.

यावेळी प्राजक्ताने नाकात अंगठी, केसात गजरा आणि हातात हिरव्या बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात दिसते आहे.

प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याने संगीत सोहळ्यात ब्लॅक रंगाचे आउटफिट परिधान केले होते.

संगीत सोहळ्यात प्राजक्ता वृशांकसोबत थिरकताना दिसली. तिच्या हातात शँपेनचा ग्लासदेखील पाहायला मिळत आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

यापूर्वी या जोडप्याच्या हळदी सेरेमनीचे फोटो समोर आले होते. ज्यात दोघांनी व्हाइट रंगाचे आउटफिट निवडले होते.

प्राजक्ता कोळी आणि वृशांक खनल २५ फेब्रुवारीला सात फेरे घेणार आहेत.