Nikki Tamboli: स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 23:08 IST2022-06-09T23:04:11+5:302022-06-09T23:08:02+5:30

Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते.

अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते.

इन्स्टाग्रामवर निक्की तांबोळीचे ३.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिथे ती दररोज तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. फॅन्ससुद्धा तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि शेअरचा पाऊस पाडत असतात.

निक्की तांबोळीने आपल्या जबरदस्त स्टाइल सेन्सने ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीची फॅशन क्विन आहे हे दाखवून दिले आहे. निक्की इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही आऊटफिट्समध्ये सुंदर दिसते.

निक्कीचे फॅन्स सतत इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात. कुठल्याही इव्हेंट किंवा फंक्शनमध्ये निक्की तिच्या चार्मिंग लूक आणि स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते.

निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात ही दक्षिणेतील हॉरर चित्रपट कंचना ३ मधून केली होती. हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला होता.

कंचना ३ शिवाय निक्कीने काही अन्य तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्याशिवाय खतरों के खिलाडी ११ मध्येही ती स्पर्धक म्हणून दिसली आहे.

तसेच टीव्ही शो खतरा खतरामध्येही निक्की तांबोळी गेस्ट म्हणून दिसली होती. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट बघता बघता व्हायरल होत असतात.