Tejashree Pradhan : ना जान्हवी, ना मुक्ता अन् नाही स्वानंदी, बालपणी या नावाने ओळखली जायची तेजश्री प्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:41 IST2025-09-12T16:36:59+5:302025-09-12T16:41:04+5:30
Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.

तेजश्री प्रधान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
तेजश्री प्रधानने अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. तिचं फॅन फॉलोव्हिंग खूप आहे.
तेजश्री प्रधान तिच्या अभिनयासोबत व्यक्तीमत्त्वामुळे चर्चेत येत असते.
तेजश्री प्रधान सध्या झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांची तुटेना' या मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे.
या मालिकेत तेजश्री स्वानंदीच्या आणि सुबोध समरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
मालिकेत स्वानंदी या नावाने वावरत असलेल्या तेजश्रीला घरी कोणत्या नावाने हाक मारतात, हे माहिती आहे का?
एका मुलाखतीत तेजश्री प्रधानने बालपणीच्या टोपणनावाबद्दल सांगितलं होतं.
तेजश्री प्रधानला बालपणी चिंकी या नावाने ओळखलं जायचं.