'नवा गडी नवं राज्य'फेम सुलक्षणाबाईंची रिअल लाइफ लेक आहे डॉक्टर; तुम्ही पाहिलंय का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 07:00 IST2023-04-17T07:00:00+5:302023-04-17T07:00:00+5:30

Varsha dandale: वर्षा दांदळे यांच्या लेकीने त्यांच्या आजारपणात प्रचंड मेहनत घेत त्यांना बरं केलं होतं.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रिय ठरला आहे.

राघव, आनंदी आणि रमा या तिघांव्यतिरिक्त इतरही कलाकारांनीही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे.

वर्षा दांदळे यांनी या मालिकेत राघवच्या आईची म्हणजेच सुलक्षणाबाईंची भूमिका साकारली आहे.

प्रेमळ,थोडीशी वेंधळी अशी भूमिका साकारुन वर्षा दांदळे यांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.

वर्षा दांदळे सोशल मीडियावर सक्रीय असून आज त्यांच्या लाडक्या लेकीविषयी जाणून घेऊयात.

मालिकेत वर्षावर प्रचंड प्रेम करणाऱ्या सुलक्षणाबाईंना खऱ्या आयुष्यातही एक लेक आहे.

वर्षा दांदळे यांच्या लेकीचं नाव तन्मयी मुजुमदार असं आहे. तन्मयी एक phisiotherapist असून वर्षा दांदळे यांच्या अपघातानंतर तिने आईला बरं करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.

तन्मयीचं लग्न झालं आहे. तीदेखील सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे सक्रीय आहे.