'माझी तुझी रेशीमगाठ'फेम विश्वजीत आहे हॉटेल व्यवसायिक; पाहा मराठमोळ्या अभिनेत्याची लक्झरी लाइफस्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 12:29 IST2022-06-17T12:24:11+5:302022-06-17T12:29:17+5:30

Anand kale: Kawasaki ninja 1000 ही बाईक त्याने काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. या बाईकची किंमत १२ ते १५ लाख एवढी आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जवळपास सगळेच कलाकार प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे यशचा विश्वजीत काका.

दारुच्या आहारी गेलेला विश्वजीत, परीमुळे पुन्हा सरळमार्गावर आला. दारुची साथ सोडत त्याला कुटुंबाचं महत्त्व कळालं आहे. त्यामुळे मिथिलासह आजोबाही आनंदात आहेत.

विश्वजीतची भूमिका ताकदीने पेलणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आनंद काळे असं असून तो केवळ अभिनेताच नाही तर एक व्यावसायिकदेखील आहे.

आनंद काळे खऱ्या आयुष्यात एक यशस्वी व्यावसायिक असून त्याचे काही हॉटेल्स आहेत.

मुळचा कोल्हापूरच्या असलेल्या आनंदचं प्राथमिक शिक्षण माईसाहेब बावडेकर स्कूल मधून झालं आहे. तर, डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्स मधून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या ‘घे भरारी’ या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अनेक गाजलेले चित्रपट, मालिकांमध्ये त्याने काम केलं.

अभिनयासह आनंदला व्यावसाय करायची आवड असल्यामुळे त्याने कोल्हापूरात ‘हॉटेल राजपुरुष’ या नावाने हॉटेल सुरू केलं.

२०१६ मध्ये त्याने ‘हॉटेल कार्निव्हल’ हे दुसरं नवीन हॉटेल सुरु केलं.

हॉटेलसह त्याचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. २००६ मध्ये त्याने ‘महालक्ष्मी सिने सर्व्हिस’ या नावाने प्रोडक्शन हाऊस उभारलं. या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी लागणारे कॅमेरे, लाईट्स, क्रेन, जनरेटर, व्हॅनिटी व्हॅन, लेबर पुरवले जातात.

आनंदला लक्झरी कार आणि बाईकं आकर्षण आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. Kawasaki ninja 1000 ही बाईक त्यांनी काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. या बाईकची किंमत १२ ते १५ लाख एवढी आहे.

आनंद याचा ‘न्यू गणेश आर्ट’ नावाने गणपतीच्या मुर्त्या बनवण्याचा वडिलोपार्जित व्यवसायदेखील आहे.