तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:56 IST2025-04-20T16:42:18+5:302025-04-20T16:56:27+5:30
प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच सुंदर साडीत खास फोटोशूट (Saree Photoshoot) केले आहे.
आकाशी रंगाच्या साडीवर प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
सुंदर अशा साडीवर प्राजक्तानं ऑक्सडाईज ज्वेलरी (oxidized jewelry) परिधान केली आहे
अतिशय हलका मेकअप आणि डोळ्यांवर काळा चष्मा घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
प्राजक्ता माळीचा गॉगलमध्ये अनोखा स्वॅग पाहायला मिळत आहे.
तिची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
साडी असो वा वेस्टर्न ड्रेस प्रत्येक लूक प्राजक्ता अगदी सहजपणे कॅरी करते.
दरम्यान प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तिचा फुलवंती हा चित्रपट २०२४ मध्ये रीलीज झाला होता.
प्राजक्ताचा 'चिकी चिकी बूबूम बूम' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला होता. आता प्राजक्ताच्या नव्या प्रोजेक्टचीच चाहते वाट पाहात आहेत.