अरुंधतीच्या लेकीचा राजेशाही थाट; रॉयल लूकमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:10 IST2023-09-20T17:03:52+5:302023-09-20T17:10:39+5:30

Apurva gore: अपूर्वा कलाविश्वासह सोशल मीडियावर तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे. गेल्या काही दिवसांपासून अपूर्वा सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या इशाच्या पात्रावर विशेष भर दिला जातोय. त्यामुळे अपूर्वा चर्चेत येत आहे.

अपूर्वा कलाविश्वासह सोशल मीडियावर तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

अलिकडेच अपूर्वाने नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत येत आहेत.

अपूर्वाच्या पोस्टवर चाहते कायम कमेंटचा पाऊस पाडत असतात.

अपूर्वाने नुकतंच एका राजेशाही थाटात फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

अपूर्वाचं प्रत्येक फोटोशूट चर्चेत येत असतं