एकावर प्रेम, दुसऱ्यासोबत लिव्ह इन, आता तिसऱ्याच व्यक्तीसोबत या अभिनेत्रीने केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 13:06 IST2022-12-06T13:03:10+5:302022-12-06T13:06:30+5:30

Divya Agarwal: बिग बॉस ओटीटी फेम दिव्या अग्रवाल हिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला आहे. दिव्याने व्यावसायिक अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुडा केला आहे. तिने तिच्या वाढदिवसादिवशी जीवनातील नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे.

बिग बॉस ओटीटी फेम दिव्या अग्रवाल हिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला आहे. दिव्याने व्यावसायिक अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुडा केला आहे. तिने तिच्या वाढदिवसादिवशी जीवनातील नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे.

दिव्या अग्रवाल हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये अपूर्व पाडगावकर आणि दिव्या अग्रवाल हे एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत. आता हे फोटो व्हायरल होत आहेत.

दिव्याचा होणारा पती अपूर्व पाडगावकर याच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तो अनेक रेस्टॉरंट्सचा मालक आहे. उद्योजक असण्याबरोबरच तो उच्चशिक्षितही आहे. तो इंजिनियर आहे. तसेच त्याच्याकडे एमबीएची पदवीही आहे.

दरम्यान, दिव्या अग्रवाल ही तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे नेहमी चर्चेत असते. दिव्या डेटिंग रियालिटी शो MTV Splitsvilla मध्ये प्रियांक शर्माच्या प्रेमात पडली होती. त्यांनी उघडपणे आपल्यातील प्रेम जाहीर केले होते. मात्र नंतर प्रियांक बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्यांनी ब्रेकअप करून एकमेकांचे रस्ते वेगळे केले.

प्रियांक शर्मासोबतचं नातं संपुष्टात आल्यानंतर दिव्या रोडीज फेम वरुण सूदच्या प्रेमात पडली होती. दिव्या आणि वरुणच्या प्रेमाची खूप चर्चा झाली होती.

या शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघांचही प्रेम अधिकच रंगलं होतं. दिव्या आणि वरुण लिव्ह इनमध्ये राहत होते. तसेच त्यांनी लग्नाची तयारीही केली होती. मात्र अचानक दोघांचं ब्रेकअप झालं. दिव्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून याची माहिती दिली होती.

मात्र आता अपूर्व पाडगावकरच्या रूपात दिव्या हिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला आहे. दिव्या अपूर्वसोबतच्या नात्याच्या सुरुवातीने खूप आनंदित आहे. आता या अभिनेत्रीचे फॅन्सही तिला शुभेच्छा देत आहेत.