मोठा सोफा आणि चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरचं मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:12 IST2023-09-27T11:54:58+5:302023-09-27T12:12:59+5:30

Saie Tamhankar : मुळची सांगलीची असलेली सई ताम्हणकर आता मुंबईकर झाली आहे. आता सई ताम्हणकर सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने मराठीसह बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

मुळची सांगलीची असलेली सई ताम्हणकर आता मुंबईकर झाली आहे. आता सई ताम्हणकर सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे.

सईने तिच्या या आलिशान घराची झलक व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे. आतापर्यंत तिने एकूण १० घरे बदलली. मात्र, आता तिने अकरावे घर स्वतःचे हक्काचे असे विकत घेतले आहे.

सईच्या या आलिशान घरात मोठे दरवाजे, खिडक्या आणि लक्झरी फर्निचर आहे.

सईच्या या घरात मोठा लिव्हिंग रूम असून, त्यात मोठी शोभेची झाडं लावण्यात आली आहेत.

तर, सईच्या चप्पल आणि बुटांसाठी एक वॉर्डरॉब आहे.

सईच्या या घराला बाल्कनी असून घरातून खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो आहे.