शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इतकं सोप्प नव्हतं राव! किरणसोबत लग्न करण्यासाठी आमिरला मोजावे लागले होते तब्बल 50 कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 2:16 PM

1 / 8
किरण राव आता आमिर खानची पत्नी राहिलेली नाही. काहीच महिन्यांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला.
2 / 8
किरण राव तशी गुणी दिग्दर्शिका आणि लेखिका. पण आमिर खान आयुष्यात आला आणि आमिरची पत्नी हीच तिची जणू ओळख बनली होती.
3 / 8
‘लगान’च्या सेटवर किरण आमिर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2005 मध्ये दोघांनीही लग्नगाठ बांधली.
4 / 8
लग्नाच्या जवळपास 15 वर्षांनंतर आमिर व किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याच किरणशी लग्न करण्यासाठी आमिर खानला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
5 / 8
पण हे खरं आहे. होय, कारण किरणच्या प्रेमात पडला तेव्हा आमिर विवाहित होता. रिना दत्त त्याची पत्नी होती. रिनाला घटस्फोट दिल्याशिवाय किरणशी लग्न करणं शक्य नव्हतं.
6 / 8
रिनाला घटस्फोट देण्यासाठी आमिरला जवळपास 50 कोटी रुपये मोजावे लागले होते. आमिरने पोटगी म्हणून रिनाला 50 कोटी रुपये दिले होते.
7 / 8
रिनाला घटस्फोट दिल्यानंतर तीन वर्षांनंतर आमिर आणि किरणने लग्न केले होते.
8 / 8
करिअरच्या सुरुवातील किरण रावने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
टॅग्स :Kiran Raoकिरण रावAamir Khanआमिर खान