साधीसुधी 'कमळी' खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस, फोटो पाहून अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल
By देवेंद्र जाधव | Updated: July 30, 2025 13:19 IST2025-07-30T13:05:15+5:302025-07-30T13:19:29+5:30
कमळी मालिकेतील अभिनेत्री रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. अभिनेत्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत

झी मराठीवर सध्या 'कमळी' मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचं वेगळं कथानक आणि कलाकारांचं सुंदर अभिनय यामुळे ही मालिका टीआरपीमध्येही टॉपवर असते
अभिनेत्री विजया बाबरने कमळीची भूमिका साकारली आहे. विजया मालिकेत साधा फ्रॉक, केसात वेणी असा साध्या अंदाजात दिसत असली तरीही रिअल लाईफमध्ये विजया खूप ग्लॅमरस आहे
विजया बाबरचे सोशल मीडियावर हॉट आणि ग्लॅमरस फोटो दिसतात. विजया या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते. फार कमी वयात विजयाने स्वतःचं नाव इंडस्ट्रीत कमावलं आहे.
विजया बाबरने याआधी जय जय स्वामी समर्थ आणि छोट्या बयोची मोठी गोष्ट या मालिकांमध्ये अभिनय केला. विजयाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
विजया फक्त २५ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात तिने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं नाव कमावलं असून टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केलाय.
विजया दिसायला खूप सुंदर असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. विजया पारंपरिक आणि मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसते
विजयाच्या कमळी मालिकेला सध्या प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. विजयाच्या अभिनयाचंही खूप कौतुक होतंय.