कंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 20:54 IST2020-05-26T20:54:45+5:302020-05-26T20:54:45+5:30

कंगना रानौतने नुकतेच तिच्या ऑफिस कम स्टुडिओचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिने तिच्या या आलिशान ऑफिसचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या ऑफिसचा लूक पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

कंगनाने ऑफिसचा लूक एलिम डेकोर इंडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे.

कंगनाने या ऑफिसचे उद्घाटन जानेवारीत केले होते.

हे भव्य स्टुडिओ आणि ऑफिस मुंबईतील पाली हिल क्षेत्रात असून त्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स ठेवण्यात आले आहे.

एका मासिकाशी बोलताना कंगनाने सांगितले की, तिला अशी जागा हवी होती जिथे जुन्या वस्तूंपासून बनलेले सामान आणि शिवलेल्या कपड्यांसोबत जुना लूक हवा होता.

याशिवाय ऑफिस प्लास्टिक फ्री हवे होते.

जानेवारीमध्ये कंगना व तिच्या कुटुंबासोबत या ऑफिसमध्ये पूजाअर्चा केली होती.

इंडियाच्या टीव्हीच्या रिपोर्टनुसार या ड्रीम स्टुडिओसाठी कंगनाने तब्बल 48 कोटी खर्च केले आहेत.