या अभिनेत्रीने केला काँग्रेस नेत्यासोबत साखरपुडा, लवकरच अडकणार लग्नबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:18 IST2021-03-13T17:11:16+5:302021-03-13T17:18:46+5:30

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मेहरीन पीरजादाने काँग्रेसचे नेते भाव्या बिष्णोईसोबत साखरपुडा केला.
जयपूरमधील एका मोठ्या किल्ल्यात हा समांरभ पार पडला.
या समारंभाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रीण उपस्थित होते.
मेहरीनने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.
मेहरीन आणि भाव्या यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याविषयी सगळ्यांना सांगितले होते.
मेहरीन आणि भाव्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
खरे तर मेहरीन आणि भाव्या 2020 मध्ये लग्न करणार होते. पण कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले.