Indian Idol 12: फेम सिंगर सायली कांबळेने बॉयफ्रेंडसोबत केली एंगेजमेंट, पाहा सुंदर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:33 IST2021-12-22T16:14:37+5:302021-12-22T16:33:41+5:30

'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) मध्‍ये दुसरी उपविजेती ठरलेली सायली कांबळे (Sayli Kamble) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सायली कांबळेने बॉयफ्रेंड धवलसोबत एंगेजमेंट केली आहे. (Photo Instagram)

सायलीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत होती. (Photo Instagram)

सायलीचा होणारा नवरा धवलनेही इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यासोबतच एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. धवलने सायलीसाठी लिहिले की, 'मी तुझ्यासोबत हसायला नेहमीच असेन. जेव्हा दुःखा अशील तेव्हा तुझा आधार होईन. मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.'(Photo Instagram)

सायलीने धवलसोबत रोमँटिक डान्सही केला होता. त्यांच्या एंगेजमेंट सेरेमनीचे व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.'(Photo Instagram)

सायली कांबळेने याच वर्षी सप्टेंबरमध्ये धवलसोबतचे नातं ऑफिशल केलं होतं. (Photo Instagram)

बॉयफ्रेंड धवलसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'चलो जी आज साफ कहती हूं..इतनी सी बात है..मुझे तुमसे प्यार है।'(Photo Instagram)

'इंडियन आयडॉल 12' दरम्यान सायली कांबळेचे नाव सह-स्पर्धक निहाल तारोसोबत जोडले गेले. पण सायलीने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, त्यांच्यामध्ये कोणताही रोमँटिक अँगल नाही आणि निहाल हा तिच्या 'भावा'सारखा आहे. 'इंडियन आयडॉल 12' पवनदीप राजनने जिंकले, तर अरुणिता कांजीलाल ही पहिली उपविजेती ठरली. (Photo Instagram)