जे बात..! गौतमी पाटीलचा पहिला मराठी चित्रपट थायलंडला होणार शूट, झळकणार या अभिनेत्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 19:31 IST2023-01-02T19:22:28+5:302023-01-02T19:31:47+5:30

सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे.

सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) डान्सची तुफान चर्चा आहे.

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे.

अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. मात्र आता गौतमीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

लवकरच गौतमी मराठी चित्रपटातून नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

घुंगरू हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. या चि​​त्रपटाचे अर्धे शूटिंग जवळ जवळ पूर्ण झाले आहे.

गौतमी पाटीलच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं शूटिंग हंपी, सोलापूर, माढा आणि परदेशात थाय​​लंड येथे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

चित्रपटाची निर्मिती तसेच लेखन बाबा गायकवाड यांनी केले आहे.

या चित्रपटात गौतमी पाटील सोबत कोण झळकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

यावरचा पडदा आता हटला असून चित्रपटाचे लेखक आणि निर्माते बाबा गायकवाड हेच मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बाबा गायकवाड यांनी कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून काम केले होते. राजकारण आणि समाजकारणाची देखील त्यांना आवड आहे.

घुंगरू चित्रपटात शीतल गीते, सुदाम केंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, वैभव गोरे हेही कलाकार झळकणार आहेत.

कलावंताच्या जीवनावर भाष्य करणारा घुंगरू असणार आहे. कलावंतांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न बाबा गायकवाड यांनी केला आहे. चित्रपट निर्मितीसाठी तब्ब्ल दीड कोटींचा खर्च आला असेही सांगितले जात आहे.