'गाढवाचं लग्न' सिनेमातील सावळ्या कुंभाराची गंगी आता दिसते अशी, ओळखणंही कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:55 IST2025-07-11T11:46:13+5:302025-07-11T11:55:16+5:30
गंगेची भूमिका इतकी गाजली की आजही सावळ्या कुंभाराच्या गंगेला प्रेक्षक विसरलेले नाहीत.

'गाढवाचं लग्न' सिनेमात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे हिने त्यांच्या पत्नीची म्हणजे गंगेची भूमिका साकारली होती.
गंगेची भूमिका इतकी गाजली की आजही सावळ्या कुंभाराच्या गंगेला प्रेक्षक विसरलेले नाहीत.
आजही 'गाढवाचं लग्न' सिनेमा त्याच उत्साहाने रसिक पाहतात आणि हसून हसून लोटपोट होतात.
सर्वांच्या लाडक्या गंगीला आजही रसिक त्याच भूमिकेने ओळखत असले तरी आता काळानुसार तिच्यातही बदल झाला आहे.
दिवसेंदिवस गंगी म्हणजेच राजश्री लांडगे ग्लॅमरस होत चालली आहे.
गंगी खऱ्या आयुष्यात अधिक ग्लॅमरस असून तिचा गावरान अंदाज रसिकांना पसंत पडला अगदी त्याचप्रमाणे तिचा हा ग्लॅमरस अंदाज रसिकांना भावतो आहे.
सोशल मीडियावर विविध अदांमधील फोटो पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल.
अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन राजश्री सध्या राजकारणात, समाजकारणात सक्रिय झाली आहे.
गाढवाचं लग्न चित्रपटात राजश्रीने गंगीची भूमिका गाजवली होती. नाथा पुरे आता,सिटीझन अशा मोजक्याच चित्रपटातून ती झळकली आहे.
अभिनय आणि निर्माती क्षेत्रात येण्याअगोदरपासूनच तिचा राजकारणाशी जवळचा संबंध आहे.
राजश्रीचे आजोबा कर्मवीर मारुतीराव लांडगे पाटील हे राजकारणातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तर तिचे वडीलही पाटबंधारे खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण याचा तिला जवळचा अनुभव आहे.