'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:13 IST2025-08-13T18:08:08+5:302025-08-13T18:13:30+5:30

Zapatlela Movie : 'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची ही आवडी आता दिसते खूपच वेगळी आणि या मालिकेत करतेय लक्षवेधी भूमिका

९०च्या दशकातील लोकप्रिय ठरलेल्या मराठी सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे 'झपाटलेला'. हा चित्रपट मराठीतील लोकप्रिय भयपट आहे.

झपाटलेला सिनेमात लक्ष्या आणि तात्याविंचू आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, किशोरी आंबिये, पूजा पवार अशी स्टारकास्ट होती.

'झपाटलेला'मध्ये लक्ष्याच्या प्रेयसी म्हणजेच आवडी आठवतेय का? ही भूमिका अभिनेत्री पूजा पवार यांनी साकारली होती. या भूमिकेने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.

पण, 'झपाटलेला'मधील लक्ष्याची ही आवडी आता काय करते हे तुम्हाला माहितीये का? आता त्यांना ओळखणं खूप कठीण झालं आहे.

पूजा पवार यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. रंग प्रेमाचा, सर्जा, एक होता विदुषक, उतावळा नवरा या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत.

अभिनय बेर्डेच्या अशी ही आशिकी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

. कारभारी लयभारी, बापमाणूस, काव्यांजली आणि आई कुठे काय करते यासह बऱ्याच मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत.

सध्या पूजा पवार स्टार प्रवाह वाहिनीवर हळद रुसली, कंकू हसलं या मालिकेत काम करताना दिसत आहे. यात त्या बाळजाबाईची लक्षवेधी भूमिका साकारत आहेत.

पूजा पवार या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत आणि चाहत्यांना अपडेट देताना दिसतात.