'सही पकडे है' असं म्हणणारी अंगुरी भाभीचे शिक्षण जाणून वाटेल आश्चर्य'; एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:39 IST2022-01-08T17:26:11+5:302022-01-08T17:39:02+5:30

छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं पात्र म्हणजे अंगुरी भाभी.अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) प्रचंड लोकप्रिय आहे. या भूमिकेतून शुभांगी अत्रेने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे.

'अंगुरी भाभी' भूमिकेमुळे ती सगळ्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

चाहते तिला अंगुरी भाभी नावानेच जास्त ओळखतात.

मालिकेत तोडकं-मोडकं इंग्लिश बोलणारी अंगुरी खऱ्या आयुष्यात खूप शिकली आहे.

जाणून आश्चर्य वाटेल तिनं एमबीए मास्टर्स केलं आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली होती.

अभिनयासोबतच ती उत्तम कथ्थम नृत्यांगणादेखील आहे.

या मालिकेने तिला पैसा प्रसिद्ध आणि प्रतिष्ठा सगळं काही मिळवून दिलं आहे.

शुभांगीला या मालिकेत काम करण्याचे चांगलंच मानधन मिळतं.

शुभांगी अत्रे एका एपिसोडसाठी तब्बल 40 ते 50 हजार रुपये मानधन घेते.