मराठी अभिनेत्रीनं अनुभवली वाराणसीची भव्य देवदिवाळी; अयोध्येतही पोहोचली, पाहा सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:13 IST2025-11-10T17:55:14+5:302025-11-10T18:13:30+5:30
वाराणसीची दिव्य देवदिवाळी ते अयोध्येतील राम मंदिर दर्शन! मराठी अभिनेत्रीच्या ट्रीपचे फोटो व्हायरल!

अभिनेत्री दिशा परदेशी ही मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. काही सिनेमांमध्येही दिशा झळकली आहे.

दिशा सोशल मीडियावर सक्रिय असून ती वैयक्तिक आणि करिअरचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.

धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा संगम असलेल्या वाराणसीमध्ये (काशी/बनारस) दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी देवदिवाळी यंदा दिशा परमारने प्रत्यक्ष अनुभवली. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाराणसीमध्ये देवदिवाळी म्हणजे हजारो दिव्यांची रोषणाई आणि गंगा नदीच्या किनारी होणारा एक 'दिव्य सोहळा' असतो. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये गंगा घाट दिव्यांनी उजळून निघाल्याचं दिसलं.

दिशाने गंगा नदीत बोटिंग करतानाचे खास फोटो शेअर केले आहेत. रात्रीच्या वेळी हजारो दिव्यांच्या रोषणाईत गंगा नदीचे सौंदर्य अधिकच तेजस्वी दिसून आलं.

गंगाकिनारी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने देवदिवाळीच्या या सोहळ्याला चार चाँद लावले होते. तिनं शेअर केलेले हे तेजोमय फोटो चाहत्यांना खूप आवडलेत.

तसेच तिच्या फोटोंमध्ये वाराणसीच्या प्रसिद्ध गंगा आरतीची झलक पाहायला मिळाली.

फक्त वाराणसी नाही तर दिशानं अयोध्येतील प्रभू राम मंदिराला देखील भेट दिली आणि प्रभू श्री राम यांचं दर्शन घेतलं.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत दिसली होती.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दिशा मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. आजही ती मॉडेल म्हणून लोकप्रिय आहे. फिल्फेअर, फेमिना मॅगझीनसाठी तिने काम केलं आहे.

















