दिल बेचारा प्रीमियर: ट्विटरवर ट्रेंड करतोय सुशांत सिंग राजपूत, समोर येतेय चाहत्यांची मिळती जुळती प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 20:11 IST2020-07-24T20:11:19+5:302020-07-24T20:11:19+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघीचा दिल बेचाराचा प्रीमिअर डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.
दिल बेचारा हा चित्रपट सुशांतचा शेवटचा सिनेमा आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
चित्रपट रिलीज होण्यापूर्वी #SushantSinghRajpoot ट्विटरवर ट्रेंड होत आहे. चाहते एकमेकांना सुशांतचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी सांगत आहेत.
या चित्रपटातून कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे.
हा चित्रपट हॉलिवूड सिनेमा 'द फॉल्ट इन आर स्टार्स'चा हिंदी रिमेक आहे.
या चित्रपटातून संजना सांघी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
सुशांतचा हा सिनेमा सर्व सबस्क्रायबर्स आणि नॉन सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध आहे.
या सिनेमातील सर्व स्टार कास्ट खूप भावूक आहे.
दिल बेचारामध्ये सैफ अली खानदेखील दिसणार आहे.
दिल बेचारामध्ये लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे.