Dheeraj Dhooper Baby Boy: 'कुंडली भाग्य' फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:29 IST2022-08-10T16:29:08+5:302022-08-10T16:29:08+5:30

'कुंडली भाग्य' फेम धीरज धूपर (Dheeraj Dhoopar) बाबा झाला आहे. धीरज धूपर यांची पत्नी विनी अरोरा हिने बाळाला जन्म दिला आहे.

विनी अरोरा आणि धीरज धूपर हे एका मुलाचे आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्याने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'कुंडली भाग्य' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या धीरज धूपरने 2016 मध्ये विनीसोबत लग्नगाठ बांधली.

विनी आणि धीरज यांची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती. 'माता-पिता के चरणों में स्वर्ग' शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती.

6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धीरज धूपर आणि विनी अरोरा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.