एका झटक्यात बदललं शेफाली शाहचं आयुष्य...! ठरली OTTवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 17:24 IST2021-06-28T17:11:29+5:302021-06-28T17:24:18+5:30
शेफाली शाह टीव्ही व फिल्मी दुनियेतील एक लोकप्रिय नाव आहे. पण आत्ताकुठे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर तिला खरं स्टारडम मिळत आहे.

शेफाली शाह टीव्ही व फिल्मी दुनियेतील एक लोकप्रिय नाव आहे. पण आत्ताकुठे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर तिला खरं स्टारडम मिळत आहे.
होय, रंगीला, सत्या, मान्सून वेडिंग, रेस अगेन्स्ट टाईम यासारख्या सिनेमात शेफाली झळकली. पण ‘दिल्ली क्राईम’ या ओटीटीवर प्रदर्शित वेबसीरिजने जणू शेफालीचं नशीब पालटलं.
आज शेफाली ओटीटीवरची सर्वात बिझी आणि सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे.
बॉलिवूडमध्ये शेफालीने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. देखील शेफालीला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.
वन्स अगेन या नेटफ्लिक्सवरच्या सिनेमात शेफालीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.पाठोपाठ ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं तिचं आयुष्य एका झटक्यात बदललं. तिला खास ओळख मिळाली.
म्हणूनच, ओटीटीने मला नवे पंख दिलेत, मला एक नवी ओळख दिली, असे शेफाली म्हणते.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ती बोलली. ओटीटीवर कुणीही हिरो वा हिरोईन नसतो. प्रत्येक भूमिका दमदार असते. ओटीटीने मला इतक्या वर्षात जे मिळालं नव्हतं ते सर्व दिलं, असं ती म्हणाली.
दिल्ली क्राईम या वेबसीरिजमध्ये शेफालीने डीसीपी वर्तिका चतुर्वेदी ही व्यक्तिरेखा साकारली. तिची ही भूमिका तुफान गाजली.
सध्या शेफालीकडे कामाची कमतरता नाही. अनेक प्रोजेक्टवर तिचं काम सुरू आहे. अगदी शेफाली आज ओटीटीवरची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.