Dashavatar Box Office: 'दशावतार' ऐकत नाय! बॉक्स ऑफिसवर धुवांधार, मराठी सिनेमाला 'अच्छे दिन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:32 IST2025-09-18T10:55:29+5:302025-09-18T13:32:11+5:30
'दशावतार' सिनेमामुळे मराठी सिनेमाला अच्छे दिन आले आहेत. प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाचे सर्व शो हाऊसफूल होत आहेत.

'दशावतार' हा मराठी सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसलेल्या या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
'दशावतार' सिनेमामुळे मराठी सिनेमाला अच्छे दिन आले आहेत. प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाचे सर्व शो हाऊसफूल होत आहेत.
दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या ताकदीचं आणि कोकणातील परंपरा, निसर्गसौंदर्याचं दर्शन घडवणारा 'दशावतार' प्रेक्षकांच्या काळजाला थेट हात घालत आहे.
'दशावतार' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. सहाव्या दिवशीही सिनेमाने कोटींमध्ये कमाई केली आहे.
सुबोध खानोलकरांनी दिग्दर्शित केलेला 'दशावतार' सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.३५ कोटींचा गल्ला जमवू शकला आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, आत्तापर्यंत या सिनेमाने एकूण ९.४५ कोटींचा बिजनेस केला आहे.
'दशावतार'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बॉलिवूड चित्रपटांवरही सिनेमा भारी पडल्याचं दिसत आहे.
या सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, भरत जाधव, सुनील तावडे, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे अशी स्टारकास्ट आहे.