IN PICS : सिनेप्रेमींना आहे या चित्रपटांची प्रतीक्षा, एक एका सिनेमावर खर्च झालाय पाण्यासारखा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:37 IST2021-08-09T14:28:00+5:302021-08-09T14:37:58+5:30

कोरोना महामारीच्या काळात अख्खी चित्रपटसृष्टी ठप्प पडली. पण आता इंडस्ट्री रूळावर येतेय आणि अशात काही बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. त्यावर एक नजर...

केजीएफ 2 हा पाण्यासारखा पैसा खर्च करून तयार करण्यात आलेला बिग बजेट सिनेमा बनून तयार आहे. कोरोना महामारीमुळे तो रखडला. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर सिनेमाकडे सर्वांच्या नजरा लागला आहे. कोट्यवधी रूपयांचे बजेट असलेला हा मल्टिस्टार सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

शाहरूख खानच्या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. लवकरच शाहरूखचा ‘पठाण’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येतोय. हा एक बिग बजेट सिनेमा आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ या बिग बजेट सिनेमाचीही जोरदार चर्चा आहे. शेकडो कोटींचा बजेट असलेला हा सिनेमाही एक बहुप्रतिक्षीत सिनेमा आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर ‘राधे श्याम’ या सिनेमावर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. हा बिग बजेट सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना बघता येणार आहे.

हृतिक रोशन व दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘फायटर’ हा बिग बजेट सिनेमाही येत्या काळात सिनेप्रेमी बघू शकणार आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. हा बिग बजेट सिनेमाही या वर्षी प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.

दिवंगत जे जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला आणि कंगना राणौतची मुख्य भूमिका असलेला ‘थलायवी’ हा सुद्धा एक बिग बजेट सिनेमा आहे.

निर्माता मधू मंटेना यांनी अलीकडे रामायणावर आधारित एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीये. 600 कोटींवर बजेट असलेला हा सिनेमाही बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या रांगेत आहे.

प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचीही घोषणा झाली आहे. यात दीपिका पादुकोण त्याच्यासोबत दिसणार आहे. हा सुद्धा एक बिग बजेट सिनेमा आहे.