'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक

By देवेंद्र जाधव | Updated: June 11, 2025 16:46 IST2025-06-11T16:20:24+5:302025-06-11T16:46:50+5:30

आभाळमायात चिंगी साकारणाऱ्या अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नात एक खास गोष्ट करुन सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवलंय. काय केलं अभिनेत्रीने?

'आभाळमाया' मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. मालिकेत सुकन्या मोनेंची मुलगी अर्थात चिंगीची भूमिका खूप गाजली

चिंगीची भूमिका साकारली अभिनेत्री स्वरांगी मराठेने. गोड, निरागस अशी चिंगी सर्वांच्या मनात घर करुन गेली. बालपणात लोकप्रिय झालेल्या स्वरांगी मोठं झाल्यावरही अभिनय क्षेत्रात सक्रीय राहिली

स्वरांगी मराठेने पुढे स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत आणि पोरबाजार या सिनेमात अभिनय केला. एका गोष्टीमुळे स्वरांगीची खूप चर्चा झाली. काय होतं कारण

स्वरांगी मराठेने २०१६ साली निखिल काळेसोबत लग्न केलं. स्वरांगी आणि निखिलच्या लग्नाची खूप चर्चा झाली. यामागचं कारण खास होतं

स्वरांगी आणि निखिलने कोणताही गाजावाजा न करता मराठमोळ्या पारंपरिक थाटात लग्न केलं. या दोघांनी लग्नात अवास्तव खर्च टाळला

लग्नामध्ये होणारा वाजवी आणि अनावश्यक खर्च टाळून स्वरांगी आणि निखिल यांनी पैसे वाचवून ते एका अनाथ आश्रमाला दान केले. स्वरांगीच्या या निर्णयाचं खूप कौतुक झालं होतं

मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी लग्नात मोठा खर्च करतात. पण स्वतःच्या लग्नातला खर्च वाचवून स्वरांगीने तो निधी दान करुन तिने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला.