या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? ५ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:17 IST2025-01-21T11:46:22+5:302025-01-21T12:17:52+5:30

मराठी आणि बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री पाच वर्षांनी पुन्हा एकदा कमबॅक करतेय

या अभिनेत्रीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री पाच वर्षांनी पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात कमबॅक करतेय

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सागरिका घाटगे. सागरिका ५ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात दिसणार आहे

'ललाट' असं सागरिकाच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो सागरिकाने शेअर केलेत

सागरिका घाटगे या लूकमध्ये ओळखूच येत नाहीये. सागरिकाने हे फोटो शेअर करताच लोकांनी कमेंट्स करुन तिला पसंती दिलीय

सर्वांना माहितच असेल की, सागरिका घाटगे क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी आहे. दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केलं होतं

सागरिका घाटगे २०२० मध्ये 'फूटपायरी' या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ती आता ललाट सिनेमात दिसणार आहे

सागरिका घाटगेच्या या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सागरिकाने 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमातही काम केलंय