अभिनय सोडून व्यवसायात आजमावले नशीब; बॉलिवूडच्या 'या' स्टार्सनी करिअरमध्ये गाठली नवी उंची
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:19 IST2023-11-27T16:12:21+5:302023-11-27T16:19:36+5:30
बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावणं हे प्रत्येकाच स्वप्न असतं. पण याला काही कलाकार अपवाद ठरले आहेत. अभिनयाचं तारांगण सोडुन त्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपला जम बसवला आहे.

एकेकाळी हिंदी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण करुनसुद्धा हे स्टार्स आपले वैयक्तिक आयुष्य आनंदात जगत आहेत. कोणी प्राध्यापक तर कोणी शेतकरी म्हणून करिअरमध्ये वेगळी दिशा निवडली आहे.
सीआईडी या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेता विवेक मशरु घराघरात पोहोचला.अभिनेता विवेक मशरुने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला. परंतु अभिनयाकडे पाठ फिरवुन हा अभिनेता बंगळुरू विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी करत आहे.
स्टार प्लसवरील लोकप्रिय ठरलेली मालिका 'दीया और बाती हम' या मालिकेतुन अनस रशीद प्रेक्षकांच्या समोर आला. आज हा अभिनेता अभिनय सोडून शेतकरी म्हणून शेती करण्याचं काम करतोय.
'एक्सक्यूज मी' आणि 'स्टाइल' या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका वठवून अभिनेता साहिल खान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण अचानकपणे या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली.आजच्या घडीला हा अभिनेता गोव्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर चालवतो. त्यातून तो कोट्यवधींची कमाई करतो.
मयुरी कांगो या अभिनेत्रीला 'पापा कहते हैं' या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. 2009 मध्ये अभिनेत्रीने अभिनय सोडून वेगळा पर्याय निवडला. आणि ही अभिनेत्री आज गुगलमध्ये काम करत आहे.