सुपरस्टार अभिनेत्रीची नात! प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बँकरशी लग्न करून इंडस्ट्री सोडली; हेअर ड्रेसरचं केलं काम,कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:01 IST2025-11-20T16:26:25+5:302025-11-20T17:01:31+5:30

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बँकरशी लग्न करून इंडस्ट्री सोडली, कोण आहे ती?

८०-९० च्या दशकात निखळ सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर.

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा जन्म २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. तिचं शिक्षण हे मुंबईतच झालं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची ती नात आहे. हा अभिनयाचा वारसा तिने आणि तिची बहीण नम्रताने पुढे सुरु ठेवला.

रमेश सिप्पी दिग्दर्शित 'भ्रष्टाचार "(१९८९) या चित्रपटातून शिल्पाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रेखा यांच्यासोबत गोपी नावाच्या अंध मुलीची भूमिका साकारली होती.

शिल्पा शिरोडकरने 'भ्रष्टाचार', 'किशन कन्हैय्या', 'हम', 'खुदा गवाह', 'आंखें', 'पहचान', 'गोपी किशन', 'बेवफा सनम', 'मृत्युदंड' आणि 'गज गामिनी' यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

शिल्पा चांगली अभिनेत्री होती परंतु तिला टायपकास्ट करण्यात आलं. या प्रतिमेमुळे शिल्पाच्या हातून खूप चांगल्या संधी निसटल्या.प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने साल २००० मध्ये बँकर अपरेश रणजित यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या जोडप्याला अनुष्का नावाची एक मुलगी आहे.

एका मुलाखतीमध्ये शिल्पा शिरोडकरने सांगितलं होतं की, लग्नानंतर शिल्पा शिरोडकर तिच्या पतीसोबत पहिल्यांदा नेदरलँड्स आणि त्यानंतर ती न्यूझीलंडला शिफ्ट झाली. तिथे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि ती पार्लरमध्ये हेअर ड्रेसरचं काम करु लागली.