IN PICS : अचानक गायब झाल्यात या बॉलिवूडच्या बाला! यांच्या बोल्डनेसपुढे फेल होत्या मोठमोठ्या नट्या!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 17:11 IST2023-01-20T16:45:34+5:302023-01-20T17:11:43+5:30
Bollywood Actress : एकेकाळी या अभिनेत्रींची प्रचंड क्रेज होती. पण आज यापैकी अनेकजणी ग्लॅमर सोडून आयुष्य जगत आहेत.

अभिनेत्री अंतरा माळी आज बॉलिवूडमधून गायब आहे. १९९८ साली ‘ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटातून अंतराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अंतराने आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त १२ चित्रपटात काम केलं. त्यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. अखेर अंतराने बॉलिवूडलाच रामराम ठोकला. जून, २००९मध्ये तिने कुरीन यांच्याशी लग्न केले. कुरीन हे जीक्यू मॅगझिनचे संपादक आहेत. अनेक फ्लॉप चित्रपट देऊन ही कुरीन यांच्याशी लग्न केल्यानंतर अंतरा कोटींची मालकीण झाली.
पाप या चित्रपटापासून फिल्मी करिअर सुरु करणारी उदिता गोस्वामी संसारात रमली आहे. २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी उदिता पुढे अक्सर आणि जहर या सिनेमातही दिसली. पण बॉलिवूडमध्ये फार लांबचा पल्ला तिला गाठता आला नाही. १२ वर्षांच्या करिअरमध्ये तिने केवळ १२ सिनेमे केलेत. मोहित सूरीसोबत संसार थाटल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला तो कायमचाच.
२००४ साली शाहरुख खानच्या 'स्वदेश' सिनेमातून गायत्री जोशी घराघरात पोहोचली. गायत्रीने पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. 'स्वदेश' प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत तिने विकास ऑबेरॉय या बिझनेसमनसोबत लग्न केलं. आज ती बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असून परदेशात आपल्या कुटुंबियांसोबत राहते.
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच्या अफेअरमुळेच किम शर्मा अधिक चर्चेत राहिली. सुपरहिट सिनेमा ‘डर’मध्ये किम अगदी छोट्याशा भूमिकेत झळकली होती. यानंतर सात वर्षांनी ‘मोहब्बतें’मध्ये ती सपोर्टिंग रोलमध्ये दिसली. पण तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. आजकाल केवळ बॉलिवूडच्या पार्ट्यांमुळे आणि लव्ह अफेअरमुळेच ती चर्चेत असते.
२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई जणू गायब आहे. पार्ट्या आणि इव्हेंट सोडले तर प्राची बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक चित्रपट देणारी ही अभिनेत्री मल्याळम चित्रपटात बिझी आहे.
काजोलची लहान बहीण तनीषा मुखर्जी हिने २००३ साली बॉलिवूड डेब्यू केला. पण करिअर फार काही चाललं नाही. १३ वर्षाच्या करिअरमध्ये तिने केवळ १२ चित्रपटांत काम केलं. पण यापैकी कुठलाही सिनेमा तिला यश मिळवून देऊ शकला नाही.‘बिग बॉस ७’मध्ये ती झळकली होती.
सन २००३ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या चित्रपटातील निर्जला आठवते? राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. अभिनेत्री भूमिका चावलाने या चित्रपटात निर्जलाची भूमिका साकारली होती. भूमिकाने 2007 मध्ये भूमिकाने योगा टीचर भरत ठाकुरसोबत लग्न केले. २०१६ मध्ये आलेल्या ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये भूमिका अखेरची दिसली होती. यामध्ये तिने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. भूमिका आता चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटूंबात व्यस्त आहे.
सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे,‘मोहब्बतें’ गर्ल प्रिती झांगियानी. प्रिती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणंही कठीण होईल.
शिल्पा शेट्टीनं अपार यश मिळवलं. पण तिच्या तुलनेत तिची बहीण शमिता शेट्टी काहीशी अपयशी ठरली. २००० मध्ये ‘मोहब्बते’ चित्रपटातून शमिताने बॉलिवूड डेब्यू केला.‘मोहब्बते’ हिट झाला पण शमिताची झोळी मात्र खाली राहिली. अर्थात पुढे ती काही चित्रपटात दिसली. पण आली तशी गायब झाली. दीर्घकाळ चित्रपटांपासून दूर असलेली शमिता ‘बिग बॉस १५’मध्ये दिसली होती. हा शो ती जिंकू शकली नाही.
२००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने २००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली. मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. मध्यंतरी मीटू मोहिमेमुळे ती चर्चेत आली होती.