शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hardik Pandya Natasa Stankovic: बिकिनी लूक ते प्रेमाची मिठी... Hot & Fit हार्दिक-नताशाचे रोमँटिक फोटोज् पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 1:08 PM

1 / 6
Hardik Pandya Natasa Stankovic Romantic Photos: 'टीम इंडिया'चा धडाकेबाज क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टँकोविक यांची लव्ह स्टोरी खूपच भारी आहे. हार्दिकने समुद्राच्या मधोमध बोटीत नताशाला अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. तेव्हापासून हार्दिक-नताशा हे भारतातील Hot & Fit कपल म्हणून ओळखलं जातं.
2 / 6
हार्दिकने नताशाला प्रपोज केले तेव्हाच तो खूप रोमँटिक असल्याचे स्पष्ट झाले होते. नुकतीच हार्दिक-नताशाने आपल्या कुटुंबीयांसोबत ग्रीस मध्ये सुटी एन्जॉय केली. त्यावेळी त्यांनी आवर्जून काही रोमँटिक पोज मधील फोटोशूट केले.
3 / 6
हार्दिकची पत्नी नताशा ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. ती कायम तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. नुकतेच तिने आपला बिकिनी लूक मधील काही फोटोज शेअर केले होते. त्यापैकी काही फोटो हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये समाविष्ट केलेत.
4 / 6
हार्दिक-नताशा हे कायम विविध कारणांसाठी चर्चेत असतात. पण यावेळी हार्दिक, नताशा, त्यांचा मुलगा अगस्त्य यांनी ही सुटी आपल्या कुटुंबीयांसोबत साजरी केल्याचं दिसून आलं. अशातही या जोडप्याने स्वत:चा 'We Time' शोधलाच.
5 / 6
हार्दिक नताशा यांनी ग्रीस मधील एका आलिशान व्हिला मध्ये वास्तव्य केले होते. त्यांचा व्हिला अथांग अशा समुद्राला लागूनच होता. त्यामुळे त्यांनी तेथे स्विमिंग कॉस्ट्यूम परिधान करून देखील फोटोशूट केले.
6 / 6
फिटनेसच्या बाबतीत देखील ही जोडी भारतातील सर्वोत्तम जोड्यांपैकी एक आहे. त्यामुळेच हार्दिक नताशाच्या जोडीला चाहते Hot & Fit जोडी म्हणतात. हार्दिकने आपल्या Instagram Account वर हे सर्व फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :hardik pandyaहार्दिक पांड्याnatasa stankovicनताशा स्टँकोव्हिचViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम