फुलांची उधळण अन् मित्रांचा जल्लोष! 'बिग बॉस' फेम लोकप्रिय अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:12 IST2024-11-12T13:53:07+5:302024-11-12T14:12:09+5:30
बिग बॉस १६ मध्ये सहभागी असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

बिग बॉस फेम अभिनेत्री श्रीजिता डेने तिचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या सहभागात पार्टनरसोबत पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातलाय
काही महिन्यांपूर्वी श्रीजिता आणि तिच्या बॉयफ्रेंडने ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते
आता १६ महिन्यांनी श्रीजिताने भारतीय परंपरेनुसार पुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा घाट घातलाय.
श्रीजिताने नुकतंच बॉयफ्रेंड मायकलसोबत थाटामाटात हळदीचा आणि मेहंदीचा समारंभ केला. दोघांनी हटके आणि रोमँटिक फोटोशूटही केलंय
श्रीजिता बिग बॉस १६ मध्ये सहभागी होती. तिची बिग बॉसमधील शिव ठाकरे आणि इतरांसोबत चांगली मैत्री होती
श्रीजिता आणि तिच्या बॉयफ्रेंडने १६ महिन्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातल्याने तिचे चाहते उत्सुक असून तिचं अभिनंदन करत आहेत
श्रीजिता आणि तिच्या बॉयफ्रेंडवर फुलांची उधळण करण्यात आली. दोघांच्या मित्रांनी या खास सोहळ्यात जल्लोष केलेला दिसला