३ लग्ने, दोन घटस्फोट, ५ कोटीची पोटगी; फारच वादग्रस्त आहे साऊथचा स्टार पवन कल्याणची लव्ह लाइफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:12 IST2022-03-02T11:47:42+5:302022-03-02T12:12:23+5:30
Pawan Kalyan Personal Life : पवन कल्याण हा साऊथच्या सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ असलेल्या पवन कल्याणने आतापर्यंत तीन लग्ने केली.

'भीमला नायक' या साऊथच्या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सुपरस्टार पवन कल्याणची मुख्य भूमिका असलेल्या 'भीमला नायक' ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. अशात अभिनेता पवन कल्याणच्या पर्सनल लाइफबाबतही चर्चा होत आहे.
पवन कल्याण हा साऊथच्या सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ असलेल्या पवन कल्याणने आतापर्यंत तीन लग्ने केली. तिन्ही लग्ने चर्चेत होती. वैवाहिक जीवन योग्य चाललं त्यामुळे नंतर घटस्फोट चर्चेत राहिले. घटस्फोटानंतर पोटगी म्हणून दिेलेले पाच कोटी रूपयांची खूप चर्चा झाली.
पवन कल्याणने त्याच्या डेब्यू सिनेमाच्या रिलीजनंतर १९९७ मध्ये नंदिनीसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. पवन आणि नंदिनी यांच्यात वाद निर्माण झाला होता. २००१ साली पवन कल्याणने को-स्टार अभिनेत्री रेणु देसाईसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता.
मीडिया रिपोर्टनुसार, २००४ मध्ये रेणु आणि पवन यांना एक मुलगा झाला. जेव्हा पवन रेणुसोबत लिव्ह-इनमध्ये होता तेव्हा तो पहिली पत्नी नंदिनीपासून वेगळा झाला नव्हता. दोघांचा घटस्फोटही झाला नव्हता.
२००७ मध्ये नंदिनीने पवन कल्याण विरोधात केस ठोकली. आरोप लावला की, त्याने घटस्फोट न घेता रेणुसोबत दुसरं लग्न केलं. ज्यावर अभिनेत्याने सांगितलं की, त्याने रेणुसोबत लग्न केलं नव्हतं. विशाखापट्टनमच्या एका मॅजिस्ट्रेट कोर्टाने पुराव्याअभावी त्याला आरोपातून मुक्त केलं होतं.
जुलै २००७ मध्ये पवन कल्याणने विशाखापट्टनमच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्याने दावा केला होता की, नंदिनी लग्नानंतर लगेच त्याला सोडलं. पवनचा हा आरोप नंदिनीच्या वकिलांनी फेटाळला होता. ऑगस्ट २००८ मध्ये ५ कोटी रूपयांच्या पोटगीवर घटस्फोट झाला.
२००९ मध्ये पवन कल्याणने ८ वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रेणुसोबत लग्न केलं. त्यांच्या मुलीचा २०१० मध्ये जन्म झाला. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. २०१२ मध्ये पवन आणि रेणुचा घटस्फोट झाला. दोनदा घटस्फोट झाल्यावर अभिनेता तिसऱ्यांदा प्रेमात पडला.
कल्याणने तिसरं लग्न रशियन नागरिक असलेल्या Anna Lezhneva सोबत केलं. 'तीन मार' सिनेमाच्या शूटींग दरम्यान त्यांची भेट झाल होती. सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांचं लग्न झालं. या लग्नातून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता पवन आनंदात संसार करत आहे.