उगाच नाही म्हणत सुपरस्टार्स...! या बॉलिवूड स्टार्सनी ‘खूप काही’ सहन केलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:29 IST2021-08-03T18:15:58+5:302021-08-03T18:29:58+5:30

होय, कितीतरी नावाजलेले स्टार्स एकेकाळी नाकारले गेले होते. पण आज तेच झगमगत्या दुनियेचे स्टार्स म्हणून मिरवत आहेत.

आज महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ यांनाही जास्त उंचीमुळे नकार पचवावे लागले. अगदी आवाजामुळेही त्यांना नाकारलं गेलं.

गोविंदाची क्रेझ आजही कायम आहे, यावरून तो किती मोठा स्टार आहे याची कल्पना येते. पण याच गोविंदाला कधीकाळी रंगरूपावरून नकार पचवावे लागले होते.

आज बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान यालाही रिजेक्शन झेलावं लागलं. सुरूवातीला आला तेव्हा त्याच्या कामाची साधी दखलही कुणी घेतली नाही. पण फक्त मेहनतीच्या जोरावर शाहरूखनं हवं ते मिळवलं.

तब्बूला अनेकांनी का नाकारलं तर पुरूषी दिसते म्हणून. पण हीच तब्बू आज आघाडीची अभिनेत्री आहे.

अनुष्का शर्मा आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. पण सुरूवातीच्या काळात सुंदर नाही म्हणून अनेक निर्मात्यांनी तिला नाकारलं होतं.

कतरिना कैफ रूपाने देखणी होती. पण तिचं विदेशीपणं स्वीकारणं सुरूवातीला प्रेक्षकांना जड गेलं होतं. शिवाय हिंदीची बोंब होती.यामुळं करिअरच्या सुरूवातीला तिला अनेक नकार पचवावे लागले.

रणवीर सिंगला का नाकारलं गेलं तर उत्तर भारतीयासारखा लुक आहे म्हणून. होय, सुरूवातीच्या काळात यावरून त्याला अनेक नकार मिळाले.

इरफान खान आज आपल्यात नाही. आपल्या दमदार अभिनयानं इरफाननं लाखो लोकांची मनं जिंकली. पण आश्चर्य म्हणजे, सुरूवातीच्या काळात त्याचा हाच अभिनय निर्मात्यांना टुकार वाटायचा. कितीदा तरी त्याला पैसे न घेता काम करावं लागलं होतं.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयावर आज प्रेक्षक फिदा आहेत. पण करिअरच्या सुरूवातीला दिसण्यावरून त्याला बरंच काही ऐकावं लागलं. अनेकांनी तर तू इंडस्ट्रीत काम करूच शकणार नाहीत म्हणत त्याला अक्षरश: हाकलून लावलं होतं.

अजय देवगण बॉलिवूडमध्ये आला तेव्हा त्याचा मामुली चेहरा पाहून अनेकांनी नाकं मुरडली होती. अनेक निर्मात्यांनी याच कारणानं त्याला नाकारलं होतं.

कोंकणा सेन ही गुणी अभिनेत्री. पण तिलाही सावळ्या रंगामुळं अनेक नकार पचवावे लागले होते.

साऊथचा सुपरस्टार धनुष यालाही त्याच्या मामुली चेह-यामुळं व रंगरूपामुळं नकार सहन करावे लागले.