PHOTOS: सिनेइंडस्ट्रीला रामराम करत ही अभिनेत्री करतेय शेती, वाचून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:56 IST2022-07-14T15:32:01+5:302022-07-14T15:56:33+5:30

लाईमलाईटपासून कोसोदूर राहून ही अभिनेत्री शेती करतेय ही बघून नेटकरी तिचे कौतुक करतायेत.

'अगले जन्म मोहे बिटीया ही किजो' मालिकेमुळे अभिनेत्री रतन राजपुत प्रकाशझोतात आलेली रतन राजपूत सध्या शहरी जीवन सोडून आपल्या गावी रमलेली दिसत आहे. त्यामुळे रतनबाबत तिच्या चाहत्यांच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Photo Instagram)

अभिनयापासून दूर असलेली रतन सध्या देसी जीवन जगत आहे किंवा म्हणा की ती शेतकरी झाली आहे. होय, आजकाल रतन शेती करत आहे, ज्याची झलक ती तिच्या यूट्यूब ब्लॉगद्वारे चाहत्यांना अनेकदा दाखवते.(Photo Instagram)

रतन राजपूत मुळची बिहारची, याठिकाणी असणाऱ्या तिच्या आरा नावाच्या गावात ती पोहोचली आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री सांगते गावकऱ्यांनी तिला वैयक्तिकरित्या आमंत्रित केले आहे. गावात पोहोचलेली रतन राजपूत शेतात काम करणाऱ्या महिलांना मदत करते. ती भात लावणी करायला जाते. (Photo Instagram)

रतनला अशा प्रकारे शेतात काम करताना पाहून चाहत्यांनी त्याचे खूप कौतुक केले. कोरोना काळात रतन तिच्या गावी अडकली होती. (Photo Instagram)

रतन सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रिय असून तिचे हे गावातील व्हिडिओ, फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

'दिल से दिया वचन', 'राधा की बेटीयाँ कुछ कर दिखायेगी', 'रिश्तों का मेला', 'महाभारत', 'संतोषी माँ', 'बिग बॉस 7', 'फिअर फाईल्स' या शो आणि मालिकांमध्ये ती झळकली होती.(Photo Instagram)

२०१० मध्ये 'रतन का रिश्ता' या रिएलिटी शोमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.(Photo Instagram)

या शोमुळे तिला प्रचंड पैसा प्रसिद्धी मिळाली असली तरी प्रचंड वादातही अडकली होती.(Photo Instagram)