'आशिकी गर्ल' अनु अग्रावालचं 'सेक्स लाइफ'बद्दल खळबळजनक विधान, म्हणाली - 'प्रेम आणि शारिरीक संबंध...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:21 IST2022-12-31T17:16:41+5:302022-12-31T17:21:52+5:30
Anu Aggarwal : अनु अग्रवाल ५३ वर्षांची झाली आहे आणि आजही ती सिंगल आहे. एका मुलाखतीत ती आपल्या सेक्स लाईफबद्दल बोलली...

आशिकी गर्ल म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अनु अग्रवाल आता ५३ वर्षांची आहे.
एका अपघातानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर ती सिनेइंडस्ट्रीपासूनही दूरावली होती.
अपघातामुळे तिचा चेहरा बदलला गेला होता ज्यामुळे तिला ओळखणे खूप कठीण झाले होते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेळी तिने प्रेम आणि सेक्सविषयी मोठे विधान केले आहे.
अनु अग्रवाल अपघातानंतर एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते. अनु अग्रवालने प्रेम आणि सेक्सविषयी एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या शारिरीक गरजा खूप आधीच संपल्या आहेत.
मला एनजीओच्या मुलांकडून खूप प्रेम मिळते. हे प्रेम खूप पवित्र आणि निरागस आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी प्रेमाची परिभाषा बदलली आहे.
ती पुढे म्हणाली की, छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रेम मिळते. त्यामुळे सेक्स आणि प्रेम या गोष्टींना मी सारखे नाही मानत.
१९९९ साली अनु अग्रावालचा कार अपघात झाला होता. त्यानंतर ती तब्बल २९ दिवस कोमामध्ये होती. अपघातानंतर तिचे करिअर संपुष्ठात आले होते. त्यामुळे ती सिनेइंडस्ट्रीतून दूर गेली होती.
सध्या मेंटल हेल्थ फाऊंडेशनमध्ये व्यग्र असते. काही दिवसांपूर्वी ती इंडियन आयडल शोमध्ये सहभागी झाली होती. मात्र तिचे काही सीन यामधून डिलीट केल्याचा आरोप तिने केला होता.
त्यामुळे इंडियन आयडल शो चांगलाच ट्रोल झाला होता. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.
अनु अग्रवालचा जन्म ११ जानेवारी १९६९ रोजी नवी दिल्लीत झाला होता. ती दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्रात सुवर्णपदक विजेती होती.
मॉडेलिंगनंतर तिने १९९० साली महेश भट यांच्या 'आशिकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर सिनेइंडस्ट्रीत तिची मागणी खूप वाढली होती.
या चित्रपटानंतर तिला सर्वजण 'आशिकी गर्ल' म्हणून ओळखू लागले होते.