उन्हाळ्यामध्ये sunshine yellow ट्रेन्डची सेलिब्रिटींमध्ये वाढती क्रेझ; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:20 IST2019-04-22T16:14:45+5:302019-04-22T16:20:22+5:30

उन्हाळा सुरू झाला असून वातावरणामध्ये प्रचंड उकाडा वाढला आहे. अशातच लाइट आणि ब्राइट कलर्स वेअर करण्याचा ट्रेन्ड सध्या सुरू झाला आहे. या सीझनमधील ट्रेडिंग कलर्सबाबत बोलायचे झाले तर यावेळी उन्हाळ्यामध्ये सनशाइन येलो कलर सर्वात जास्त ट्रेन्ड होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच जण यलो कलर्सच्या आउटफिट्मध्ये दिसत आहेत. अशातच काही बॉलिवूड सेलिब्रिटींकडू टिप्स घेऊन तुम्हीही हे आउटफिट्स अगदी सहज कॅरी करू शकतात.
सोनमचा यलो लूक
बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूरही ह ट्रेन्ड फॉलो करताना दिसून येत आहे. सोनमने वेअर केलेले आउटफिट्स या समर सीझनमध्ये वेअर करण्यासाठी परफेक्ट आहेत.
मलायका अरोराचा बोल्ड अंदाज
आपला फॅशन सेन्स आणि बोल्ड लूकने अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारी मलायकाही हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसून आली. मलायकाचा हा लूक थोडासा बोल्ड असला तरिही ती फार सुंदर दिसत होती.
यलो ऑन यलो लुकमध्ये करीना
गोष्ट जेव्हा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींची असते तेव्हा त्या यादीमध्ये करीना कपूरचं नावं असलचं पाहिजे. करिनाही काही दिवसांपूर्वी यलो ऑन यलो लुकमध्ये दिसून आली होती. करीनाने सनशाइन येलो कलरच्या या वन शोल्डर बॉडी हगिंग टॉपला मॅचिंग करणारी हाय वेस्ट पॅन्टसोबत वेअर केली होती.
आलियाचा ट्रेडिशनल अंदाज
फॅशनबाबत बोलायचे झाले तर आलिया भट्टही कोणापेक्षआ कमी नाही. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि फॅशन स्टाइल नेहमीच परफेक्ट असते. ग तो सनशाइन यलो कलरचा ड्रेस असो किंवा लेहेंगा. दोन्ही लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. समर वेडिंगसाठी तुम्ही आलियाचे दोन्ही लूक कॉपी करू शकता.
यलो स्कर्टमध्ये सोनाक्षी
मल्टी स्टारर फिल्म कलंकमधून आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये दिसलेली सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वी सनशाइन यलो कलरच्या एका ड्रेसमध्ये दिसून आली होती. सोनाक्षीने फ्लोरल प्रिंट असलेला यंलो कलरचा लॉन्ग स्कर्टला क्रॉप टॉप आणि मॅचिग श्रगसोबत कॅरी केलं होतं. हा लूक अत्यंत कॅज्युअल आणि सिम्पल होता.
माधुरीचा क्लासी अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितही या ट्रेन्डमध्ये सहभागी झाली होती. मग तो तिचा सनशाइन यलो कलरचा टॉप असो, जो तिने व्हाइट कलरच्या पॅन्टसोबत मॅच केला होता किंवा तिची यलो कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आली. इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती.