झोया फॅशन अॅण्ड लाइफ स्टाइलचा शानदार फॅशन शो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:47 IST2017-09-13T14:47:36+5:302017-09-13T14:47:36+5:30

झोया फॅशन आणि लाइफस्टाइलचा फॅशन शोचा दिमाखदार सोहळा मुंबईत पार पडला. झोया फॅशनने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून अभिनेत्री रिचा चड्डा रॅम्पवॉक करताना दिसली.

मॉडेल लुलिया वेन्चर हीनेही या कार्यक्रमाला हजेरी लावत रॅम्प वॉक केलं. लुलियाने परिधान केलेल्या लाल-काळ्या रंगाच्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधलं.

अभिनेत्री उर्वशी रौतेला डिझायनर दिना उमरोवा हिने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून रॅम्पवर उतरली होती.

अभिनेत्री मंदना करीमी हिने फॅशन डिझायनर रेश्मा मर्चंटने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केलं.