अभिनेता शिव ठाकूर आणि अभिनेत्री वीणा जगतापची रोमँटिक लव्हस्टोरी बघा फोटोंमधून!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:54 PM2020-01-16T13:54:06+5:302020-01-16T15:29:26+5:30

शिव ठाकरे व वीणा जगताप

‘बिग बॉस मराठी २’ हा रिअॅलिटी शो संपल्यानंतरही शिव ठाकरे व वीणा जगताप ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे

यंदाच्या सीझनमध्ये शिव ठाकरे व वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत आली

बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं आणि ते आतासुद्धा कायम आहे.

याचा पुरावा शिव-वीणा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे वारंवार देताना दिसतात

वीणासोबतचं नातं म्हणजे बिग बॉस हा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट नव्हता. तर मी खरंच तिच्या प्रेमात आहे, अशी कबुली शिवने दिली

वीणानेही तिच्या हातावर ‘शिव’ नावाचा टॅटू काढत प्रेम व्यक्त केलं

सीझन संपल्यानंतर शिव व वीणाचा रोमान्स संपेल, असं बोललं जातं होतं. मात्र तसं काही झालं नाही. उलट, त्या दोघांचं नातं बहरत चाललं आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही खूप खूश आहेत.

वीणा व शिव एकमेकांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असताना

शिव व वीणा यांच्या फॅन्स पेजवर शिव व वीणा यांची तुलना बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलसोबत केली जात आहे

वीणाच्या फॅन पेजवर भारतातील प्रेमळ जोडपं म्हणत स्पोर्ट्स क्षेत्रात विराट कोहली व अनुष्का शर्मा, बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आणि मराठी चित्रपटसृष्टीत शिव ठाकरे व वीणा जगताप अशी तुलना केलेला फोटो पहायला मिळतो आहे.

शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.

लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे

शिव व वीणा चा अनोखा अंदाज

शिवच्या आईला सुरुवातीला स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी खटकल्या

इतकेच नाही तर वीणा शिवच्या आईलादेखील भेटली. त्यांच्या भेटीचा फोटो शिवनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात आता वीणानं त्या दोघांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

शिव व वीणाची केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते

बिग बॉस मराठी २’ हा शो जिंकल्यानंतर शिवला १७ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. यातील काही पैसे तो ताई आणि आईला देणार असून काही इतर गोष्टींसाठी ठेवणार असल्यातंही त्याने सांगितलं.

वीणाने शिवला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनोखं गिफ्ट दिलं तेही अॅडव्हान्समध्ये. वीणानं शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढला.

बिग बॉस मराठी २’ शेवटच्या तीन सदस्यांमध्ये वीणा व शिव होते आणि या सीझनचा शिव विजेता ठरला.