Inauguration Day: बायडेन यांचा शपथविधी... पण चर्चा लेडी गागाच्या लूकचीच

By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 11:11 AM2021-01-21T11:11:23+5:302021-01-21T11:19:14+5:30

बुधवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गैरहजर राहिले होते. परंतु अनेक दिग्गजांनीही त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

या दिग्गजांच्या यादीत पॉप स्टार लेडी गागाचंही नाव आहे.

लेडी गागानं या ठिकाणी दिलेल्या परफॉर्मन्सनं सर्वांचीच मनं जिंकली. तर दुसरीकडे लेडी गागाच्या हटके लूकचीही जोरदार चर्चा झाली.

लेडी गागानं या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं होतं.

या सोहळ्यादरम्यान तिचा लूकही चर्चेचा विषय ठरला होता. लेडी गागानं Schiaparelli Haute Couture स्टाईलचा गाऊन परिधान केला होता. तसंच लाल रंगाचा लांब स्कर्टही परिधान केलेला.

लेडी गागाचा हा लूक अनेकांच्या पसंतीस उतरला. कार्यक्रमानंतर सोशल मीडियावरही या लूकची चर्चा झाली होती.

लेडी गागानं आपल्या कपड्यावर कबुतराचा एक बॅचही लावला होता. कबुतर हे शांतीचं प्रतीक असल्यानं लेडी गागानं म्हटलं.

लेडी गागानं याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत Olive ब्रांचसोबत कबुतर असल्याचं म्हटलं.

लेडी गागाच्या हेअरस्टाईलनंदेखील सर्वांचं लक्ष आकर्षित केलं. लेडी गागानं आपल्या केसांमध्ये काळ्या रंगाची रिबिनही बांधली होती.