शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'साहेब, कोणा कोणाला माझा पती बनवू', पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या महिलेने रडत रडत मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 21:23 IST

1 / 5
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर तिचे लग्न तिच्या दीरासोबत झाले होते. दीराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दुसऱ्या दीराने लग्नासाठी दबाव टाकला. साहेब, शेवटी मी माझा नवरा कोणाला करू? आपली व्यथा सांगताना महिलेला रडू कोसळले.
2 / 5
पहिल्या पतीचे 13 वर्षांपूर्वी निधन झाले - कोतवाली येथे पोहोचलेल्या पीडित महिलेने सांगितले की, 13 वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समाजातील व कुटुंबातील लोकांनी तिचे लग्न पतीच्या धाकट्या भावाशी लावले.
3 / 5
तेव्हापासून आतापर्यंत ती त्याच्यासोबत राहत होती. तिला पहिल्या पतीपासून दोन आणि दुसऱ्या पतीपासून एक मूल आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या दुसऱ्या पतीचाही मृत्यू झाला. त्यामुळे महिलेवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला.
4 / 5
दीर लग्नासाठी दबाव आणत आहे - दुस-या पतीच्या निधनानंतर दुसऱ्या दिराने तिच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यामुळे ती नाराज आहे.
5 / 5
पीडित महिलेने सांगितले की, तिला कोणी मदत करण्याचा प्रयत्न केला तर दीराकडून वाईट कृत्य केले जाते. पोलिसांना तक्रार देऊन महिलेने सांगितले की, साहेब, मला मदत करा. ही बाब निदर्शनास आल्याचे कोतवाल फतेह बहादूर सिंह भदौरिया यांनी सांगितले. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेशSexual abuseलैंगिक शोषण