Raj Kundra Case: शिल्पा शेट्टीची पोर्नोग्राफी केसमध्ये पोलिसांनी केली ६ तास चौकशी, विचारले हे १० प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:34 PM2021-07-24T15:34:04+5:302021-07-24T15:49:14+5:30

Shilpa Shetty : राज कुंद्राची पोलीस रिमांड २७ जुलैपर्यंत वाढल्यावर शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांची एक टीम अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यासाठी तिच्या जुहूच्या बंगल्यावर गेले होते.

पॉर्नोग्राफी केस (Pornography Case) मध्ये अटक झालेला बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) ची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ची चौकशी करण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले होते. पोलिसांनी शिल्पाची चौकशी केल्यावर प्रश्न उपस्थित राहत आहे की, ती सुद्धा या पॉर्न रॅकेटमध्ये सहभागी आहे का?

राज कुंद्राची पोलीस रिमांड २७ जुलैपर्यंत वाढल्यावर शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांची एक टीम अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यासाठी तिच्या जुहूच्या बंगल्यावर गेले होते. यावेळ पोलीस राज कुंद्रा यालाही सोबत घेऊन गेले होते. साधारण ६ तास दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. यावेळी शिल्पाला पोलिसांनी खालील काही प्रश्ने विचारली.

१) तुमचे जास्त शेअर्स असूनही तुम्ही वियान कंपनीतून २०२० मध्ये बाहेर का पडल्या?

२) वियान आणि कॅमरिन या कंपन्यातील पैशांच्या व्यवहाराबाबत तुम्हाला काही माहीत आहे का?

३) पॉर्न व्हिडीओ लंडनला पाठवणे किंवा अपलोड करण्यासाठी अनेकदा वियानच्या ऑफिसचा वापर केला गेला. याची तुम्हाला माहीत आहे का?

४) तुम्हाला हॉट्शॉट्सबाबात माहिती आहे का? ते कोण चालवतं?

५) हॉट्शॉटच्या व्हिडीओ कंटेटबाबत तुम्हाला काय काय माहिती आहे?

६) तुम्ही कधी हॉटशॉट्सच्या कामकाजात सहभागी होत्या का?

७) कधी हॉटशॉटवरून प्रदीप बक्शी(कुंद्राचे भाओजी)सोबत बोलणं झालं का?

८) पोलिसांनी आरोपींच्या मोबाइलमधील काही चॅट आणि मेसेज शिल्पाला दाखवले आणि त्याबाबत प्रश्न विचारले

९) तुम्हाला राज कुंद्राच्या सर्व कामकाजाची माहिती किंवा बिझनेसबाबत माहीत आहे का?

१०) राज कुंद्रा पैशांच्या व्यवहाराबाबत तुम्हाला काय काय माहीत आहे?

शिल्पा शेट्टीने पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, तिला पॉर्न अॅप आणि पॉर्न सिनेमाबाबत काहीच माहीत नाही. तिने दावा केला की, तिचा पती राज कुंद्रा निर्दोष आहे. ती म्हणाली की, दुसरे आरोपी पॉर्न बनवत असतील. लंडनमध्ये बसलेले राज कुंद्राचे नातेवाईक जे अॅपमध्ये व्हिडीओ टाकत होते, त्यांचा यात हात असू शकतो. शिल्पा म्हणाली की, तिचा पती अॅपसाठी व्हिडीओ बनवत होते, पण ते पॉर्न नव्हते.

सूत्रांनुसार, राज कुंद्राच्या अॅपबाबत आणि त्यावरील कंटेंटबाबत शिल्पा शेट्टीला पूर्ण माहिती होती. कुंद्राने या अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईची मोठी रक्कम अनेकदा शिल्पाच्या बॅंक खात्यात मागवली होती. या कंपनीतही शिल्पा सहभागी होती, पण नंतर तिने राजीनामा दिला होता.

Read in English