सॅल्यूट लेडी सिंघम! पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिला शक्तिचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:15 PM2021-03-08T21:15:45+5:302021-03-08T21:23:04+5:30

Honoring women power on Womens Day in Mumbai Police Department : पोलीस दलात काम करत असताना उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पोलिसांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे

महिला पोलिसांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावळी त्यांना सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र आणि भेटवस्तू देण्यात आली आहे.

अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी तपासाची सेन्चुरी मारणाऱ्या मालवणी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक  उषा खोसे यांना गौरविण्यात आले. 

रायगड जिल्ह्यातील धामणी गावातील ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेल्या नायगाव सशस्त्र विभागातील पोलीस नाईक ५० मुलांना दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेहाना शेख यांच्यासारख्या २८ महिला पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनाच्या काळात एकाच दिवशी चार मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या संध्या शिलवंत यांनाही यात गौरविण्यात आले.

आझाद मैदान पोलीस क्लब येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय १) एन. अंबिका, नियती ठाकर, सानप उपस्थित होते.

यात, महिला पोलिसांच नाही तर त्यांच्या कुटुंबियातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिलांचाही सत्कार यावेळी करण्यात आला आहे.  

कोरोना महामारीच्या भयंकर काळात आणि गुन्हांचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या जिगरबाज महिला पोलिसांच्या पाठीवर आज महिला दिनी सन्मानाची थाप देण्यात आली. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलीस दलातील या कर्तृत्ववान महिला पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे.