रेहाना फातिमा मुलांसमोरच झाली 'टॉपलेस', अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 20:30 IST
1 / 8या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते एवी अरुण प्रकाश यांनी तिरुवाला पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (All photos - rehanafathimaas Insta Account)2 / 8हा व्हिडिओ फातिमा यांनी 'बॉडी अँड पॉलिटिक्स' या नावाने पोस्ट केला होता, पाहता पाहता तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. दरम्यान, केरळच्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने 10 दिवसात पतनमतिट्टा जिल्हा पोलिस प्रमुखांकडून या संदर्भात अहवाल मागविला आहे.3 / 8२०१८ मध्ये सबरीमाला येथील भगवान अयप्पाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील फातिमा चर्चेचा विषय बनली होती, त्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यावेळेची हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्याचा देखील आरोप होता.4 / 8बर्याचदा वादात येणाऱ्या फातिमा यांनी २०१४ मध्ये कोची येथे मॉरल पोलिसिंगविरूद्ध ‘किस ऑफ लव’ मोहिमेमध्येही भाग घेतला होता.5 / 8फातिमाच्या जोडीदाराने सोशल मीडियावर किसची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यावर बरीच खळबळ उडाली होती.6 / 8रेहाना फातिमा यांनी शरीरावर पेंटिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर लोकांना त्याचा प्रचंड राग आला आहे आणि लोक फातिमा यांना अटक करण्याची मागणी करत आहेत.7 / 8रेहाना फातिमा यांचे नाव यापूर्वीही बर्याच वादात दिसले आहे. फातिमा सांगतात की, ती स्त्रियांबद्दलच्या रूढीवादी प्रथांना उघडपणे विरोध दर्शविते.8 / 8रेहानाने एका नावाच्या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती तिचा नवरा मनोज के श्रीधर यांनी केली होती. इंटरसेक्सुअलिटीच्या थीमवर रेहानाने या चित्रपटात अनेक नग्न आणि बोल्ड सीन दिले होते. सबरीमाला वादानंतर रेहाना म्हणाली होती की, 'अयप्पाला पहाण्याची माझी इच्छा होती. कारण मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवते आणि त्याचा आदर करतो. तसेच मी सर्व चालीरिती पाळते.