शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 7:41 PM

1 / 6
सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या हत्याकांडात पाकिस्तान कनेक्शनही समोर येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात पाकिस्तानातून क्वाडकॉप्टर ड्रोनचा वापर करण्यात आला होता. या हत्याकांडाचा तपास करणार्‍या एजन्सींना अशी माहिती मिळाली आहे की, हे ड्रोन पाकिस्तानमधून भारतात आणण्यात आले होते, जे लहान आकाराच्या क्वाडकॉप्टर ड्रोनद्वारे 10 किलो वजन उचलू शकतात.
2 / 6
पंजाबमध्ये स्थानिक गुंडांकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा ड्रोनद्वारे होत असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात ड्रोनमधून 8 ग्रेनेड, 1 अंडर ग्रेनेड बॅरल लाँचर, एक AK-47 बंदूक आणि 9 इलेक्ट्रिक डिटोनेटर यांचा समावेश होता.
3 / 6
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या तपासात ही शस्त्रे आणि स्फोटकांचा लष्करासाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. महिनाभरापूर्वी पंजाबमधील फतेहाबादमध्ये शस्त्रांची खेप पोहोचली होती. शुटर प्रियव्रत, अंकित आणि दीपक याच मार्गाने मानसा येथे पोहोचले होते.
4 / 6
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगरूप उर्फ ​​रूपा आणि मनप्रीत उर्फ ​​मन्ना हे दोन आरोपी खारदहून लुधियानामार्गे मानसा येथे पोहोचले होते. तर प्रियव्रत उर्फ ​​फौजी, अंकित आणि कशिश उर्फ ​​कुलदीप आणि दीपक उर्फ ​​मुंडी हे हिसारमधील उकलाना मंडीमार्गे फतेहाबाद हून सर्दुलगड मार्गे मानसाला पोहोचले.
5 / 6
हत्येनंतर जगरूप उर्फ ​​रूपा आणि मनप्रीत लुधियानामार्गे फरार झाले, तर प्रियव्रत उर्फ ​​फौजी, अंकित, कशिश उर्फ ​​कुलदीप आणि दीपक उर्फ ​​मुंडी हे 29 मे च्या रात्री मानसानंतर फतेहाबाद येथील हॉटेलमध्ये थांबले.
6 / 6
दुसऱ्या दिवशी रात्री तो तोशाम येथे थांबला, त्यानंतर तो एका ट्रकने गांधीनगरला पोहोचला आणि त्यानंतर मुंद्रा येथे त्याला अटक करण्यात आली.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिसPunjabपंजाबDeathमृत्यूFiringगोळीबार