शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोचिंग सेंटरचा मालक काढायचा छेड, महिलेने भररस्त्यात अशी घडवली अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 2:09 PM

1 / 6
राजस्थानमधील भरतपूरमध्ये अश्लील वर्तन आणि छेडछाड करणाऱ्या एका कोचिंग सेंटरच्या मालकाला महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. या महिलेने या रंगेल कोंचिग सेंटरच्या मालकाची भररस्त्यात चपलांनी पिटाई केली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. मारहाण केल्यानंतर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी या कोचिंग सेंटरच्या मालकाला पोलीस ठाण्यात नेले आणि त्यांना पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
2 / 6
ही घटना राजस्थानमधील भरतपूरमधील डीग भागातील आहे. येथे अमरजीत सिंह नामक एक व्यक्ती कोचिंग सेंटर आणि लायब्रेरी चालवतो. येथील एक विवाहित महिला शिक्षण घेण्यासाठी लायब्रेरीमध्ये जाते. येथील कोचिंग संचालक हा अनेक दिवसांपासून महिलेला अश्लील मेसेज पाठवत होता. मात्र सुरुवातीला या महिलेने काहीही प्रतिसाद दिला नाही.
3 / 6
करण्यात आलेल्या आरोपानुसार कोचिंग सेंटरच्या संचालकाने एकेदिवशी वायफाय कनेक्ट करण्याचा बहाणा बनवून या महिलेला ऑफीसमध्ये बनवले. त्यानंतर तिची छेड काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर या महिलेने विरोध केला तेव्हा संचालक तेथून पळू लागला. त्यानंतर याची माहिती मिळताच महिलेचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.
4 / 6
त्यानंतर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी या संचालकाला मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत नेले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली. महिला या संचालकाला चपलेने मारत होते आणि उपस्थित लोक त्याचे व्हिडीओ काढत होते. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
5 / 6
पीडित महिला डीग येथे राहते. ती अभ्यासासाठी कोचिंग सेंटरमध्ये येत असे. हा संचालक अनेक दिवसांपासून महिलेला अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. मात्र जेव्हा त्याने निमित्त काढून ऑफिसमध्ये बोलावले आणि तिची छेड काढली. तेव्हा या महिलेनेही त्याला अद्दल घडवली.
6 / 6
डीग ठाण्यातील एएसआय भवानी सिंह यांनी सांगितले की, बस स्टँडजवळ भांडण होत असल्याची सूचना मिळाली होती. तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एका कोचिंग संचालकाने महिलेची छेड काढल्याची आणि त्यानंतर महिलेने त्याला मारहाण केल्याची माहिती आम्हाला मिळाली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानIndiaभारत