बाबो! ३५ वर्षीय सुंदर बिटकॉईन किलरने जगाला लावला ९० हजार कोटींचा चुना, FBI घेत आहे तिचा शोध...

Published: May 15, 2021 10:39 AM2021-05-15T10:39:11+5:302021-05-15T10:44:42+5:30

ही क्रिप्टो करन्सी बुग्लेगिरायाच्या एका कंपनीने आणली होती. आणि या कंपनीची मालक होती रूजा इग्नातोवा. ती कमालीची सुंदर होती आणि स्वत: या क्रिप्टो करन्सीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही होती

सध्या जगभरात बिटकॉईनची चर्चा सुरू आहे. अनेक श्रीमंत लोक बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीकडे आकर्षित होत आहे. अनेकजण यात कोट्यावधी रूपये इन्व्हेस्ट करत आहेत. मात्र, २०१६ मध्ये बिटकॉईनची चमक कमी झाली होती. कारण होतं दोन वर्षाआधी मार्केटमध्ये आलेली नवीन करन्सी. ती होती वनकॉईन.

ही क्रिप्टो करन्सी बुग्लेगिरायाच्या एका कंपनीने आणली होती. आणि या कंपनीची मालक होती रूजा इग्नातोवा. ती कमालीची सुंदर होती आणि स्वत: या क्रिप्टो करन्सीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही होती

रूजा इग्नातोवाने जगभरात फिरून सांगितलं की, वनकॉईन भविष्यातील करन्सी आहे. यात गुंतवणूक करणं फार सुरक्षित आहे. तसेच यातून मोठा फायदाही मिळणार आहे. इतकंच नाही तर रूजा म्हणाली होती की, वनकॉईन करन्सी ही बिटकॉईन किलर आहे.

मार्केटही असाच काहीसा संकेत देत होतं. वनकॉईनची किंमत सतत वाढत होती आणि लोक त्यात भरभरून गुंतवणूक करत होते. रूजाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आणि नंतर जर्मनीच्या एका युनिव्हर्सिटीममधून तिने पीएचडी घेतली.

तिने सांगितलं होतं की, पीएचडी घेतल्यावर तिने मॅकेंजी अॅन्ड कंपनीसोबत काम केलं. ही जगातली प्रसिद्ध बिझनेस कन्सल्टिंग कंपनी आहे.

रूजाने केवळ ३ महिन्यात जगभरातून साधारण १२ बिलियन डॉलर जमा केले. तेव्हा तिला जगात क्रिप्टो करन्सी क्वीनही म्हटलं जात होतं. मोठ मोठे मीडिया हाऊसेस तिच्या यशावर कव्हर स्टोरी करत होते. अशात २०१७ साल आलं.

२०१७ मध्ये रूजा म्हणाली की, ती एक नवीन धमाकेदार स्कीम आणत आहे. पण या स्कीमची घोषणा करण्याआधी ती अचानक गायब झाली. जगभरातील गुंतवणुकदार 'कोमात' गेले.

इतका मोठा घोटाळा केल्यावर एफबीआय आणि एमआय ५ सारख्या एजन्सी सगळीकडे तिचा शोध घेत आहेत. असं मानलं जात आहे की, तिने प्लास्टिक सर्जरी करून आपला चेहरा-ओळख बदलून घेतली.

सध्या ती ४१ वर्षांची आहे. पण गेल्या ४ वर्षांपासून तिला कुणीही कुठेही पाहिलेलं नाही. अशाप्रकारे रूजाने केवळ ३ महिन्यात ९० हजार कोटीपेक्षा जास्त रूपयांवर डाका टाकला होता.

त्यानंतर ती अचानक काही समजायच्या आत गायब झाली. सर्वांनाच याचा धक्का बसला. कारण अनेकांनी मोठी गुंतवणूक केली होती. पण अजूनही जगातल्या सर्वात चांगल्या समजल्या जाणाऱ्या एजन्सी वनकाईनचं रहस्य उलगडण्यात नाकाम ठरल्या आहेत. अजूनही तिचा काहीच पत्ता लागत नाहीये.