शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mumbai Cruise Drugs Case: शिरच्छेद, देशातून हकालपट्टी, जन्मठेप, या देशांमध्ये ड्रस प्रकरणातील दोषींना दिली जाते कठोर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 7:47 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मुंबईतील आलिशान जहाजावर ड्रग्स पार्टी (Cruise Ship Drugs Party) करताना सापडल्याने सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. दरम्यान, गेल्या काही काळात भारतीय तरुणांमध्ये ड्रग्स सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, ड्रग्स नियंत्रणामध्ये सरकार आणि यंत्रणांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. भारतात ड्रग्सविरोधातील कायदा कठोर आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण विविध देशात ड्रग्स प्रकरणातील दोषींना दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षांचा आढावा घेऊया.
2 / 7
मलेशियामध्ये ड्रग्स विक्री करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते. जर कुणाकडे ड्रग्स सापडले तर त्याला दंडासह तुरुंगावासाची शिक्षा सुनावली जाते. काही परिस्थितीत अशा व्यक्तीची देशातून हकालपट्टी होते. मद्यपान करून गाडी चालवल्यासही मलेशियामध्ये कठोर शिक्षा सुनावली जाते.
3 / 7
इराण सरकारकडून ड्रग्स संबंधीच्या गुन्ह्यांमध्ये कठोर भूमिका घेतली जाते. येथे अफूच्या सेवनाची समस्या गंभीर आहे. याचं मोठं कारण म्हणजे अफूचं शेजारील अफगाणिस्तानमध्ये होणारं उत्पादन. इराणमध्ये कुणी ड्रग्ससह पकडला गेल्यास त्याला जबर दंड ठोठावला जातो. तसेच काही प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते.
4 / 7
उत्तर कोरियामध्ये ड्रग्स घेऊन जाण्यास मनाई आहे. जर कुणी पकडले गेले तर त्याला दीर्घकाळापर्यंत शिबिरामध्ये कैद करून ठेवले जाते. शिबिरात राहणारे लोक कुटुंब किंवा मित्रांसोबत संपर्क करू शकत नाहीत.
5 / 7
चीनमध्ये जर कुणी ड्रग्ससोबत पकडला गेला तर त्याला सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या नशामुक्ती केंद्रात पाठवले जाते. ड्रग्सशी संबंधित दुसऱ्या गुन्ह्यासाठी मृत्युदंडाची तरतूद आहे.
6 / 7
तुर्कीमध्ये अंमली पदार्थ सापडल्यास शिक्षा म्हणून जबर दंड आणि दीर्घ कारावासाची शिक्षा सुनावली जाते. ड्रग्स विक्री केल्यास दंड अधिक कठोर केला जातो.
7 / 7
व्हिएटनाममध्ये ड्रग्सशी संबधित गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा दिली जाते. जर कुणी १.३ पौंड्सहून अधिक हेरॉईनसह सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते.
टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीAryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी