शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 11:18 IST

1 / 10
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या 14 जणांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठविली आहे.
2 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीने ही नोटीस पाठविली तो व्यापारी आहे. त्याने आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे.
3 / 10
या व्यक्तीने पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, या सर्व 14 जणांनी दोन आठवड्यांत ही रक्कम दिली नाहीत तर त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
4 / 10
दरम्यान, कोलकातामधील या व्यक्तीला आपली पत्नी काही जणांसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचा संशय होता. त्यानंतर त्याने पत्नीच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चौकशी सुरू केली.
5 / 10
चौकशीनंतर त्या व्यक्तीने 14 लोकांची यादी तयार केली आणि नंतर त्यांना 100 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठविली.
6 / 10
नोटीस पाठवताना या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या सर्वांचे माझ्या पत्नीबरोबर शारिरीक संबंध आहेत. तुम्हाला माहीत होते की, ती विवाहित आहे आणि माझ्याबद्दलही तुम्हाला माहिती होती.
7 / 10
याचबरोबर, नोटीसमध्ये या व्यक्तीने असे म्हटले आहे की, तुमच्यामुळे माझे वैवाहिक जीवन उद्‍ध्वस्त झाले आहे आणि म्हणूनच मी तणावात आहे. हे सर्व पाहता, तुम्हा सर्वांना 100 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली जात आहे.
8 / 10
नुकसान भरपाईचे पैसे पुढील दोन आठवड्यांत द्यावे लागतील. जर तसे न केल्यास तुम्हा सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
9 / 10
नोटीस पाठवण्याबरोबरच या व्यक्तीने त्या 14 जणांना सांगितले आहे की, या सर्वांनी एकत्रितपणे 100 कोटींची व्यवस्था करावी लागेल.
10 / 10
या व्यतिरिक्त त्याने असेही म्हटले आहे की, त्या 14 जणांच्या मागे त्याने ड्रायव्हरला हेरगिरीसाठी ठेवले होते, ज्यांनी या सर्वांविरूद्ध पुरेसे पुरावेही गोळा केले आहेत.
टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय