शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोटाच नोटा! युवकाची कॉलेज बॅग अन् ५०० रुपयांचे बंडल; रक्कम मोजून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 1:20 PM

1 / 8
उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शनवर एका युवकाकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. सामान्य दिसणाऱ्या या युवकाच्या बॅगेत तब्बल ३६ लाख रोकड सापडल्याने पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी युवकाला अटक केली.
2 / 8
आरोपी युवक हा वाराणसीतील राहणारा आहे. तो हावडा येथे ट्रेनने जात होता. तपासावेळी युवकाकडे इतक्या मोठ्या रक्कमेचा कोणताही कागद सापडला नाही. ही रक्कम हवालाच्या माध्यमातून ज्वेलरी व्यावसायिकांकडून वाराणसीहून हावडा येथे पाठवली जात होती असा संशय पोलिसांना आहे.
3 / 8
उत्तर प्रदेशात सध्या स्थानिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. निवडणुका पाहता पोलीस फोर्स, तपास यंत्रणा अलर्टवर आहेत. हावडा रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी असते. तिथे आरपीएफ आणि जीआरपीएफ टीमकडून संयुक्त प्रवाशांच्या सामानाचे चेकिंग करण्यात येत होते.
4 / 8
रेल्वे स्टेशनवर तपास मोहिम सुरू असताना पोलिसांची नजर एका युवकावर पडली. त्याच्याकडे छोटी बॅग होती. जी दिसायला खूप वजनदार होती. पोलिसांना संशय आल्यानंतर या युवकाची चौकशी करण्यात आली. जेव्हा पोलिसांनी ही बॅग खोलली तेव्हा त्यांना धक्का बसला.
5 / 8
या बॅगेत ५०० च्या नोटांचे बंडल सापडले. पोलिसांच्या टीमने युवकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तिथे चौकशी केली असता तो वाराणसीतील राहणारा असून बॅगेत ३६ लाख रुपये घेऊन वाराणसीतून हावडाला जात होता सांगितले.
6 / 8
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित रक्कम एका ज्वेलरी व्यावसायिकाची आहे. हवालाच्या माध्यमातून इतकी मोठी रक्कम वाराणसीतून हावडाला पाठवण्यात आली होती. सध्या पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.
7 / 8
पोलिसांनी या घटनेची माहिती आयकर विभागासह जीएसटी विभागालाही दिली आहे. या पथकाचे अधिकारीही ज्वेलरी व्यावसायिकाची चौकशी करत आहेत. हा पैसा कुठून आणला आणि कोणाकडे पाठवला जाणार होता याचा शोध घेतला जाणार आहे.
8 / 8
कॅशसह पकडलेला युवक केवळ एक छोटी बॅग पाठिला अडकवून चालला होता. त्या बॅगेचे वजन होते. ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल बॅगेत होते. युवकाच्या बॅगेतील ही रक्कम पाहून पोलिसांना नोटा मोजण्याची मशिन मागवावी लागली. आरोपी युवकाचे नाव मनिष कुमार वर्मा आहे.
टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस