शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 10:23 PM

1 / 6
जांजगीर चांपा जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्यावर-33 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 / 6
नंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्य सचिवांना संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
3 / 6
पाठक हे संचालक भूमी अभिलेख पदावर होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने जांजगीर चांपा जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक पारुल माथूर यांच्यासमोर हजर राहून तक्रारीचा लेखी अर्ज सादर केला होता.
4 / 6
गेल्या महिन्याच्या 15 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात जनक प्रसाद पाठक यांनी तिच्या नवऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
5 / 6
महिलेचा नवरा सरकारी विभागात आहे. अधिका-यांनी सांगितले की, महिलेने पाठक यांनी तिच्या मोबाइलवर अश्लील संदेशही पाठविला असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
6 / 6
त्या महिलेने त्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट काढून पोलिसांना दिले.पोलीस म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आज पाठकविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तत्पूर्वी, पाठक यांची जिल्हाधिकारी जांजगीर चांपा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या पदावरून 26 मे रोजी संचालक भूमी अभिलेख पदावर बदली झाली होती.
टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगड